तुळजापूर/ प्रतिनिधी-

 येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा  व्यवस्थापन समितीची पुनर्गठण  करण्यात येवुन   अध्यक्षपदी सौ अमृता सुदर्शन वाघमारे यांच्या सह विविध पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.

   उपाध्यक्ष पदी  सौ राजश्री अमोल कदम  निवड करण्यात आली.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार क मावळत्या अध्यक्ष श्रीमती अश्विनी शिवराज कदम यांनी केला. नूतन सदस्यांचे सर्वांनी अभिनंदन केले शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वस्वी मदत करण्याची ग्वाही अध्यक्ष व उपाध्यक्ष कडून देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ढाळे सर व सर्व शिक्षक उपस्थित होते.


 
Top