उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत सामंजस्य करार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

 महाविद्यालयातील शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध  स्वरूपाचे कौशल्याचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून  दिली जाते. अशा स्वरूपाची संधी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी परम ट्रेनिंग इंडिया लिमिटेड औरंगाबाद यांच्यासोबत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने सामंजस्य करार केलेला आहे. याचा लाभ शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार असून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

 यावेळी परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रकल्प समन्वयक अनिरुद्ध भोसले आणि  माहिती विश्लेषक संजय पंडित, स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ मारुती अभिमान लोंढे  नॅकचे सह -समन्वयक डॉ. संदीप देशमुख उपस्थित होते. सदर सामंजस्य करार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.


 
Top