तुळजापूर / प्रतिनिधी-

 शनिवारी आलेल्या शनि जयंती पार्श्वभूमीवर  तालुक्यातील  मंगरुळ सरडेवाडी परिसरात असणाऱ्या शनीदेव मंदीरात भाविकांनी शनिवार दि.२१ रोजी दर्शनार्थ  मोठी गर्दी केली.

शनीमंदीर डोंगरावर  असुन शनिवारी शनि अमावस्या निमित्ताने सकाळी शनी देवांच्या मुर्तीस तेल अभिषेक करण्यात आला . दिवसभर भाविकांनी दर्शनार्थ गर्दी केली होती. भाविकांनी शनीदेवतेस श्रीफळ वाढवुन   शनि देवतेच दर्शन  घेतले. उस्मानाबाद -सोलापूर -लातूर जिल्हतील भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी हजारो गणेश भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.  शनि जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक शनिभक्तांनी रक्तदान केले.


 
Top