उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आज दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून   प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमांनी व स्पर्धांनी  साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय प्रमोद वीर सरपंच ग्रामपंचायत कार्यालय आळणी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयकुमार नांदे व सावित्रींच्या  वेशभूषेतील आधुनिक सावित्रीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक श्री   बशीरजी तांबोळी यांनी करून सावित्रीबाईंच्या कार्याचा सर्व विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. अनेक अडचणीवर मात करीत सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचे केलेले कार्य अतुलनीय होते असे त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले. कार्यक्रमासाठी उपसरपंच कृष्णाजी गाडे व गणेश निंबाळकर आवर्जून उपस्थित होते. यानंतर शाळेच्या श्रेया माळी, श्रुती माळकर, अमृता तोर ,  श्रावणी निंबाळकर, अक्षरा कदम ,अदिती पोळ, अर्जुन वीर, गौरव भोसले, कृष्णार्ती देशमुख, ऐश्वर्या यादव, दिव्या वीर ,राज एडके, विघ्नेश कोरे ,अपूर्वा कदम ,गणेश माळी, तेजस्विनी वीर ,सुहानी मारवाडकर, हरिओम कदम, आरोही काळे, कार्तिकी भोसले इत्यादी सह अन्य  विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटा विषयी भाषणे केली तसेच सहावीच्या मुलींनी सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख ओवीद्वारे कळून करून दिली. कार्यक्रमात अगदी पहिलीपासून सातवी पर्यंतच्या मुलामुलींनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वेशभूषा साकारल्या व संपूर्ण कार्यक्रमात आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरल्या .  

 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती वर्षा डोंगरे ,श्रीमती सुलक्षणा ढगे, श्रीमती मंजुषा नरवटे मॅडम, श्रीमती सत्यशीला मेहत्रे मॅडम, श्रीमती राधा वीर मॅडम शाळेचे प्राथमिक पदवीधर श्री उत्तम काळे सर श्री हनुमंत माने व श्री दत्ता डावकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती क्रांती मते मॅडम यांनी केले.    यावेळी महिला पालक सौ उषा माळी  , सौ सुनंदा माळी , सौ कीर्ती किर्दत ,सौ श्रीदेवी दत्तात्रय माळी  , सौ विद्या देशमुख, सौ राजेश्वरी वीर उपस्थित होत्या . शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती सुनिता कराड मॅडम यांनी करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.


 
Top