उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अॅड. व्यंकटराव गुंड यांच्या अथक परिश्रमाने जिल्हयात शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आत्मनिर्भर बनविण्याचे स्वप्न पुर्ण होत आहे. त्यामुळे रूपामाता उद्योग समुह महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण करीत आहे, असे प्रतिपादन अॅड. अजीत गुंड यांनी  मुळी पुजनाच्या कार्यक्रमात रोषणपुरी येथे केले. 

रूपामाता नॅचरल शुगर संचलित युनिट क्रमांक 2, रुपामाता पावर लिमिटेड या नूतन गूळ पावडर कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम नुकताच रोषणपुरी  ता.माजलगाव येथे पार पडला. त्याप्रसंगी अॅड. अजीत गुंड बोलत होते.  पुढे बोलताना अजित गुंड यांनी बँकींग, उद्योग, दुग्धउद्योग या माध्यमातुन तरुणांना रोजगार तसेच शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रूपामाता उद्योग समुह कार्यरत आहे. उस्मानाबाद जिल्हयाप्रमाणेच बीड जिल्हयात ही रूपामाता उद्योग समुहाची विकासाची गंगा वाहत राहील, असे ही सांगितले. यावेळी रूपामाता पॉवरचे संचालक भाऊसाहेब गुंड यांचे ही भाषण झाले. 

   यावेळी  रोषणपुरी गावचे सरपंच मुक्तिराम  ताकट, माजी सरपंच  उद्धव  ताकट, केदारेश्वर बँकेचे चेअरमन  भगवान  कदम, पूनंदगावचे माजी सरपंच   शेषेराव  खडे, रोषणपूरी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुखदेव ताकट, चीफ इंजिनिअर  प्रकाश गुंड,चीफ  केमिस्ट  बालाजी कुलकर्णी, बॉयलर इंजिनिअर  लाखे, सिव्हिल इंजिनीअर  राठोड, शेतकी अधिकारी  मुलाणी, ऊस पुरवठा अधिकारी  नाटकर तसेच शेतकरी, ऊसतोड ठेकेदार, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top