तेर / प्रतिनिधी-

 तेर ता.उस्मानाबाद येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उपसरपंचपदासाठीच्या  निवडणुकीत काही लोकांनी दबाव टाकत तुमचे घर अतिक्रमित जागेवर आहे ते पाडून टाकू, तुमच्या नवऱ्याला गावात व्यावसाय करु देणार नाही अशा प्रकारचा दबाव  टाकल्यामुळे भा.ज.प.च्या उपसरपंच पदाच्या उमेदवारांस  मतदान केल्याचे माहिती महाविकास आघाडीच्या दोन फुटीर सदस्यांनी दिली.

 महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .सुरूवातीस माजी सरपंच महादेव खटावकर यांनी पत्रकार परीषदेची भुमिका विषद केली.यावेळी वार्ड क्रमांक 5 मधील जयश्री अभिमन्यू रसाळ व वार्ड क्रमांक 6 मधील मधील सदस्या प्रियंका लखन रसाळ यांनी  पत्रकार परिषदेत आपली भुमिका सांगताना काही लोकांनी तुमचे घर अतिक्रमित जागेवर आहे , तुम्हाला त्रास होईल व दबावाखाली घेऊन आम्हाला उपसरपंचपदासाठीच्या निवडणुकीसाठी भा.ज.प.च्या उमेदवारांना मत टाका म्हणून दबाव टाकला. आम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडलो नाहीत. फक्त भिती मुळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान केले अशी कबुली ग्रामपंचायत सदस्या जयश्री रसाळ व प्रियंका रसाळ यांनी दिली .

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य बाबुराव नाईकवाडी , माजी सरपंच महादेव खटावकर ,  बापू नाईकवाडी , अमोल कसबे , अविनाश आगाशे , कानीफनाथ  देवकुळे  , आप्पासाहेब चौगुले ,   बाशिद  काझी , अमोल थोडसरे , नामदेव कांबळे , धनंजय आंधळे  यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते 

 
Top