उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्तीसंग्राम चे हे अमृत महोत्सवी वर्ष असून त्या निमित्ताने १७ सप्टेंबर २०२२ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान प्रत्येक महिन्याच्या १७ तारखेला "मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समिती, जिल्हा धाराशिव" तर्फे हुतात्मा स्मारक येथे स्वच्छता अभियान, अभिवादन, व्याख्यान, चित्रप्रदर्शन असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. 

  जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही स्वातंत्र्य संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यासाठी व हा इतिहास पुढच्या पिढीला माहिती होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सहकार्य करावे याबाबत  जिल्हाधिकारी   व सिईओ जि प यांना स्मारक समितीच्या वतीने निवेदन दिले. 

यावेळी समितीचे जिल्हा संयोजक युवराज बप्पा नळे, मोहन मुंडे, सुरेश शेळके, रविंद्र शिंदे, ॲड. कुलदिपसिंह भोसले, राजेंद्र अत्रे,केशव भोसले, प्रमोद बचाटे,राजेश परदेशी, प्रविण जगताप, विजयकुमार बंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 
Top