उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी उस्मानाबाद येथील आर.पी.औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयांमध्ये डी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभ, पालक मेळावा व ओरिएंटेशन कार्यक्रम रविवार दिनांक 8 रोजी उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, एस.बीएन.एम. अध्यापक विद्यालय कळंब चे प्राचार्य सतिश मातने,शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शीचे डॉ. संतोष डिसले उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी औषध निर्माणशास्त्र क्षेत्रात भारत देश अग्रेसर असून भविष्यात या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून स्वतःचे करियर घडवावे व पालकांचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन केले.

यावेळी डॉ.सुरज ननवरे,प्राचार्य सतिश मातने,डॉ.संतोष डिसले यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर डी.फार्मसी विभाग प्रमुख प्रा. सुबोध कांबळे यांनी डी.फार्मसी अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांना सर्व विषयांची तसेच परीक्षा महाविद्यालयाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ऋतुजा आंबेकर व प्रा. सिद्धी बसाते आणि आभार प्रदर्शन प्रा.तनुजा थिटे यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा. सज्जन मगर,प्रा.रितिका पाटील, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top