उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील नारायण कॉलनी, काकडे प्लॉट येथे अंगणवाडी केंद्रास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँगे्रसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वोर करण्यात आली आहे.

 राष्ट्रवादी महिला काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.मनीषा शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन शुक्रवारी (दि.20) जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले की, नारायण कॉलनी, काकडे प्लॉट येथे दोन हजार घरे असून त्यामध्ये 100 ते 150, 0 ते 3 वर्षे, 03 ते 06 वर्षे, गरोदर माता 200, किशोरी 300 असून सदरील बालके, माता व किशोरी हे ताजा आहार व टीएचआरपासून वंचित आहेत. शाहुनगर मध्ये असलेले समर्थ मंदिर अंगणवाडीमध्ये या परिसरातील बालकांना अंगणवाडीत प्रवेश घेतला नसल्याने ती आहारापासून वंचित आहेत. नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार बालक आहारापासून वंचित राहू नये असे आदेशित केलेले आहे. त्यामुळे नारायण कॉलनी, काकडे प्लॉट येथे नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 यावेळी राष्ट्रवादी महिला काँगे्रसच्या जिल्हाध्यक्ष सौ.मनीषा शिवाजी पाटील, शहराध्यक्ष सौ.रविना पांडुरंग बिराजदार, अ‍ॅड.विवेक घोगरे उपस्थित होते.


 
Top