उमरगा/ प्रतिनिधी

 तालुक्यातुन गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर चक्क माती टाकून निक्रष्ट दर्जाचे काम केले जात असल्याने संतप्त झालेल्या दाळिंबच्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.१७)रोजी हे काम बंद पाडून निकृष्ट कामाचा निषेध केला आहे.

उमरगा-लोहारा तालुक्यातील अनेक गावातून गेलेला हा राष्ट्रीय महामार्ग असून गेली अनेक वर्षांपासून यावरील काम रखडले आहे त्यातच रस्त्यावर पडलेल्या खड्या मुळे अनेक अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला त्यातच कंत्राटदार कंपनीने अर्धवट काम ठेवून टोल वसुलीचा धडका लावल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महामार्गाचे काम तात्काळ चालू करण्यासाठी टोलनाके बंद पाडले आहेत टोलनाके बंद झाल्याने आता सध्या कामाला सुरवात करण्यात आली असली तरी कंपनीने थातुरमातुर काम चालू केले आहे.

दाळिंब गावाजवळील हरिओम ट्रेंडर्स च्या समोर केवळ रस्त्यावर माती आणून टाकत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले त्यावरून शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख सुरेश वाले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष बाबा जाफरी यांनी नागरिकांना हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून हे काम थांबविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताच ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून निकृष्ट काम बंद पाडले डांबरीकरण करण्याचा रोडवर मुरुम टाकणे गरजेचे आसताना या ठिकाणी मातीचा वापर होत आसल्याने काम बंद पाडले आहे.

या वेळी सरपंच रंजनाताई सातपुते ,उपसरपंच आसिफ शिलार, माजी सरपंच सुरेश वाले,बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्कल प्रमुख खय्युम चाकुरे, नागरिक ईलियास चिक्काळे,फिरोज बागवान आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

 
Top