उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 मराठवाडा विभाग शिक्षक मतदार संघाचे भाजपा महायुतीचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे अधिकृत उमेदवार प्रा.श्री. किरण पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने वाशी, भुम, परंडा येथे बैठकीत नियोजन करण्यात आले होते. भूम येथे  भाजप कार्यालयात धाराशिव चे जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष श्री दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री लाटे सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी संपुर्ण ताकदीने किरण पाटील यांना निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन नितीन काळे यांनी केले.  

 परंडा येथे भाजपाचे मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांनी उपस्थित शिक्षक बांधव व पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. ही निडणूक आपण चांगल्या पद्धतीने पार पाडून आपला उमेदवार विजयी होईल अशी खात्री दिली.  

 यावेळी भुम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, सुरेश बप्पा कवडे, जेष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर,प्रदेश कार्यकारणी सदस्य जालिंदर मोहिते,माजी सभापती काकासाहेब चव्हाण,माजी नगर सेवक रोहन जाधव,सुदाम पाटील,तालुका  उपाध्यक्ष बाबासाहेब वीर,महिला तालुका अध्यक्ष सौ लता गोरे,माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत  मासाळ, शहराध्यक्ष शंकर खामकर,सरचिटणीस हेमंत देशमुख,कोषाध्यक्ष सचिन बारगजे, सोनगिरी सरपंच बालाजी बांगर,पाटसांगवी सरपंच उमेश नाईकिंदे,उद्योग आघाडी अध्यक्ष रमेश बगाडे ऍड संजय शाळू, चंद्रकांत गवळी,प्रदीप साठे, संतोष औताडे,ईडा ग्रा प सदस्य लक्ष्मण भोरे,जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव खरात इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top