तुळजापूर / प्रतिनिधी-

मराठवाडा समन्वय समिती पुणे आयोजित स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भानुदासराव जयवंतराव धुरगुडे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या मराठवाडा विभागस्तरीय शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हाने बाजी मारली तर वकृत्व स्पर्धेत केज येथील विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविला. 

रविवार दिनांक एक जानेवारीरोजी वक्तृत्व ,सामान्य ज्ञान व मॅरेथॉन या स्पर्धेचे व मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराचे बक्षीस वितरण उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, उद्योजक राजकुमार धुरगुडे, मराठवाडा समन्वय समितीचे अँड. सुभाष गायकवाड ,माजी जि प सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी सात,पाच,तीन, दोन ,एक हजार व ७०१ रुपये रोख बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ स्वर्गीय भानुदास धुरगुडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलित करून करण्यात आला. मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक याप्रमाणे जब्बार बक्षुद्दीन शेख इंदिरा गांधी उच्च व माध्यमिक प्रशाला मंगरूळ ता.तुळजापूर, विक्रम बलभीमराव पाचंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानेवाडी तालुका तुळजापूर, श्रीमती वैशाली चंद्रभान चव्हाण तालुका रेनापुर जिल्हा लातूर, आश्रुबा अंकुशराव कोठावळे कळंब जिल्हा उस्मानाबाद , मोहन लक्ष्मणराव नेहरे घारपुरी जिल्हा जालना, डॉ. शहनाज बानोआली मझहर औसेकर उस्मानाबाद व नागेंद्र शांतिनाथ होसाळे कळंब जिल्हा उस्मानाबाद या शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

     या स्पर्धेचे पंच म्हणून क्रीडा शिक्षक प्रभाकर जाधव, राजेश बिलकुले ,कांता राऊत, छाया घोडके, योगेश थोरबोले यांनी काम पाहिले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले तर आभार शैलेंद्र धुरगुडे यांनी मानले. यावेळी लातुर, उस्मानाबाद ,बीड, जालना  जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.


 
Top