तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर खुर्द कडे  पायी जाणाऱ्या व्यक्तीस पाठीमागुन पिकअप धडक दिल्याने यात एक जण मरण पावल्याची घटना सोमवार दि. २रोजी १९.४५वा. तुळजापूर खुर्द जवळील मस्जीद जवळ घडली. 

या बाबतीत अधिक माहीती अशी की, तुळजापुर खुर्दु, (ता. तुळजापुर ) येथील सौदागर विश्वनाथ चव्हाण ( ४५ )सोबत गावकरी - अनिकेत शाम भोजणे (९) हे दोघे दि.०२.०१.२०२३ रोजी १९.४५ वा. सु. तुळजापुर खुर्दु मज्जीदजवळ रस्त्यावर पायी जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने पिकअप (क्र एम. एच. १३ सीयु. ३२०७)  हा निष्काळजीपने चालवल्याने सौदागर यांना पाठीमागून धडक दिल्याने   गंभीर जखमी होउन मयत झाले. तसेच अनिकेत हे किरकोळ जखमी झाला. या अपघातानंतर पिकअप चालक अपघात स्थळावरुन पसार झाला.   मयताचे भाउ-महेश चव्हाण यांनी  दिलेल्या  फिर्याद वरुन पोलिसांनी  भा.दं.सं. कलम २७९, ३०४ (अ), सह मो.वा.का. कलम १३४ (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 
Top