उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात    चोखोबा ते तुकोबा -  एक समतेची वारी या दिंडीचे आगमन झाले.  या दिंडीचे औपचारिक स्वागत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. सुधीर  पाटील यांनी केले .

  या दिंडीचे आयोजक संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे दहावे वंशज  शिवाजी मोरे महाराज  , माजी राज्यसभा खासदार अमर साबळे , प्राचार्य उल्काताई धावारे - चंदनशिवे  अध्यक्ष , संत चोखोबा अध्यासन केंद्र सचिन पाटील निमंत्रक चोखोबा ते तुकोबा एक समतेची  वारी श्रवणदादा जावळे,  वाल्मिक सरवदे, महंत तुकोबा महाराज , डॉ. बाबासाहेब वाल्हेकर, चंद्रकांत साळुंखे, अॅड शशांक साबळे अॅड. अनिता जगताप , मनोज भालेराव , विनायक राऊत ,अॅड.वाल्मिक निकाळजे ,सौ. श्रद्धा जगताप, डॉ. भरत नांदुरे, शेषाद्री डांगे , प्रा.डॉ. रमेश पांडव ,  निलेश गद्रे , फुलचंद नागटिळक , प्रा. सोमनाथ लांडगे , ऋषिकेश सकनुर , सुधीर बिक्कड , आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, संस्कार भारती चे शेषनाथ वाघ ,अभिलाष लोमटे सह इतर मान्यवर उपस्थित होते.

  शिवाजी मोरे महाराज  यांनी आपल्या भाषणात म्हटले  की, चोखोबा पासून संत तुकाराम महाराजां पर्यंत  समतेच्या वाटेवर चालत राहणाऱ्या समाजात काही स्वार्थी तत्वे घुसल्याने जातीपातीच्या राजकारणामुळे समाजाचे नुकसान होत आहे , तेव्हा ही भिंत दूर करून समता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत . त्याचबरोबर प्रत्येकाने वृक्षांचे संवर्धन करावे , असा मोलाचा उपदेश त्यांनी या निमित्ताने केला.  यावेळी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात विदयार्थी व नागरिक उपस्थित होते .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप एस .एच यांनी केले तर सर्वांचे आभार संस्था अध्यक्ष श्री . सुधीर  पाटील यांनी मानले.


 
Top