उस्मानाबाद /प्रतिनिधी- 

जि.प.प्रा.शा आळणी तालुका उस्मानाबाद ची सहल मुलांनी पुस्तकातील वाचलेले थंड हवेचे ठिकाण, समुद्र, , किल्ले, घाट, डोंगर , दरी, प्रतीध्वनी  या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष आणि मनसोक्त आनंद घेतला. 

समुद्र पहाताच त्यांच्या डोळ्यातील आनंद त्या समुद्रात देखील मावणार नाही एवढा होता.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी शाळेची शैक्षणिक सहल ➡️ शिखर शिंगणापूर ➡️ महाबळेश्वर ➡️ प्रतापगड ,रायगड ➡️नानीज मठ ➡️ ज्योतीबा देवस्थान ➡️ कोल्हापूर ( महालक्ष्मी दर्शन)  ➡️ कन्हेरी मठ ➡️ पंढरपूर  या ठिकाणांना भेटी देऊन परत आली.  

 विद्यार्थ्यांना महाबळेश्वरचे निसर्ग सौंदर्य  ,प्रतापगडावरील पराक्रम , रायगडवरील विविध वास्तू ,टकमक टोक,हिरकणी कडा,धान्य कोठार,राणी महाल,राजदरबार,शिवसमधी इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या  , नाणीजचे भव्य रथ मंदिर, , ज्योतीबाचा गुलाल.कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे प्राचीन मंदिर,  शाहू राजवाडा ,कन्हेरी मठातील भव्य ग्रामीण देखावा, गुहेतील ऋषीमुनीं विषयी माहीती, शिसमहालातील भुलभुलैया आणि पंढरपूरचे विठ्ठलाचे दर्शन घेऊन मुले आनंदून गेली.

 ग्रामीण भागातील बालकांना हा अनुभव प्रत्यक्ष देताना आम्हा शिक्षकांनाही एक वेगळे समाधान लाभत होते.   सहलीच्या काळात मुख्याध्यापक  बशीर तांबोळी  सर यांनी  मार्गदर्शन केले.  

यावेळी चालक म्हणून  तांबोळी ए ए यांनी सफाईदारपणे चालवून आम्हा सर्वांना सुखरुप घरी पोहचवले.  सहल प्रमुख दत्ता डावखरे तसेच शिक्षक हनुमंत माने,श्रीमती वर्षा डोंगरे, सुनीता कराड, राधाबाई वीर  ,उत्तम काळे यांनी सहलीत पत्यक्ष सहभाग घेऊन विद्यार्थांना ऐतिहासिक ,नैसर्गिक ,सांस्कृतिक ,सामाजिक स्थळांची माहिती दिली

 
Top