उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी निमित्त येथील श्री. तुळजाभवानी क्रीडा संकुल मैदानावर आज सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम घेण्यात आली.

 यावेळी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, उस्मानाबाद तहसीलदार गणेश माळी, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, नरसिंह ढवळे तसेच विविध विभागाचे प्लाटून्स सर्व यंत्रंणासहीत उपस्थित होते. यावेळी पोलिस विभाग, आरोग्य यंत्रणा, अग्निशमन विभाग यंत्रणा आदींची रंगीत तालीम घेण्यात आली.

 त्यानंतर उपजिल्हाधिकारी श्री.कोरडे यांनी प्रत्येक विभागांना आपापल्या दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्याचे आदेशही अधिकारी-कर्मचाऱ्यांना यावेळी दिले.


 
Top