उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नांदेड येथे दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी संपन्न झालेल्या 5व्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत उस्मानाबाद येथील 14 वर्षीय असीम इब्राहिम मिर्झा यांनी Z कॅटेगिरी exam स्पर्धेत 500 पैकी 500 गुण प्राप्त करून दणदणीत यश प्राप्त केले त्यांना मराठी चित्रपट डिशक्याव मधील अभिनेत्रा व अभिनेत्री आणि नांदेडच्या गुरुद्वारातील गुरु मेट्रो ट्रेन अबॅकस चे संचालक श्री संतोष लोहारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र ,मेडल व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले असीम मिर्झा हे उस्मानाबाद येथील सक्सेस मेट्रो ब्रेन अबॅकस खाजा नगर गल्ली नंबर 5 श्रीमती शेख मॅडम चे विद्यार्थी आहेत.

सर्व स्तरावर आसिम मिर्झा यांनी प्राप्त केलेल्या यशाचे व त्यांच्या शिक्षिका शेख मॅडम यांचे कौतुक व गौरव होत आहे.सदर स्पर्धा ही नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली होती.

 
Top