तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेचे वाटप संस्थेच्या सभासद,खातेदार, ठेवीदार यांना करण्यात येणार असून यावर्षीच्या २०२३ दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या परिपूर्ण करणे ही काळाची गरज असून  संस्था त्यादृष्टीने मार्गक्रमण करीत असून लवकरच मोबाईल बँकिंग सुविधा देण्याचा  संस्थेचा मानस असून त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.  या कार्यक्रमास संस्थेचे व्हा चेअरमन श्रीकांत भोजने सचिव सज्जन जाधव संचालक राजेंद्र माळी सुरेखा देशमाने अनुराधा गायकवाड संतोष इंगळे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते.


 
Top