तुळजापूर  / प्रतिनिधी-

 .विजय व पराभव हे जीवनाचे अविभाज्य भाग असून जिंकण्यातील आनंद भविष्याची ऊर्जा ठरतो . पराभव झालेल्या खेळाडूचा  व खेळातील कौशल्याचा आदर करायला शिका .पराभव हा जिंकण्याची प्रेरणा देतो म्हणून पराभवाने खचून जाऊ नका अशी असे सांगताना प्रत्येक जण जिंकण्यासाठीच मैदानात उतरलेला असतो . प्रत्येकाने जिद्द कायम ठेवावी . तिच तुम्हाला यशापर्यत पोहोचवते असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांनी केले. 

  तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उस्मानाबादच्या शिक्षणाधिकारी सुधा साळुंखे यांच्या हस्ते सैनिक विद्यालय तुळजापूर येथे झाले. यावेळी त्या बोलत होत्या.  याप्रसंगी गटविकास अधिकारी प्रशांत सिंह मरोड ,गटशिक्षणाधिकारी श्रीम. मेहरुन्नीसा इनामदार , विस्तार अधिकारी अर्जुन जाधव , मल्हारी माने , मल्लीनाथ काळे ,शोभा राऊत , तात्या माळी , दैवशाला शिंदे , प्राचार्य घोडके या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती होती.

    या स्पर्धेत खो-खो , व्हॉलीबॉल , योगासन , कबड्डी , थ्रोबॉल , कुस्ती व सर्व मैदानी  प्रकार या खेळाचा समावेश असून या स्पर्धा १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटात खेळल्या जात आहेत . सर्व क्रीडा प्रकारात खेळाडूंनी कौशल्यपणास लावले . सर्वांचाच यात उत्साहवर्धक सहभाग होता . संपूर्ण तालुक्यात १००० मुले - मुली खेळाडूंचा विविध क्रीडा प्रकारातून आपले कौशल्य अजमावत आहेत.   ही स्पर्धी यशस्वी होण्यासाठी  विष्णू दळवी , राजेश बिलकुले , संजय सोलनकर , सतिश हुंडेकरी , तुकाराम क्षीरसागर , ऋषी भोसले , विठ्ठल नरवडे ,रामकृष्ण खडके , नितीन ढगे , विजय माने , बालाजी पाठक , सुनिल पांचाळ , शिवदास भागवत , रेवणसिद्ध आंधळकर , करीम शेख , पवन सूर्यवंशी , अनंतकुमार डुरे , राजू गायकवाड , देविदास गायकवाड , प्रशांत काळे , प्रसाद डांगे , हे यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत .


 
Top