उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 फास्टफुडच्या काळात आरोग्याची योग्य काळजी घेणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. वसुधा दापके-देशमुख यांनी केले. 

श्री. तुळजाभवानी महाविद्यालय  येथील ज्युनिअर विभागाच्या वतीने आयोजित आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना त्या म्हणाल्या की, आधुनिक काळात वेगवेगळ्या विषाणुनी मानवाचे जीवन व्यापलेले आहे,अशा वेळी योग्य आहार आणि योग्य विश्रांती तसेच योग्य व्यायाम या सर्व गोष्टींना पर्याय नाही, घरगुती आहार हा सर्व रोगराई पासून मुक्त रहाण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे.  मोबाईलच्या अतिवापरामुळे आज निद्रानाश होतो आहे.  त्यामुळे आपले शरीर रोगमय होऊ शकते, योग्य मानसिक आणि शारीरिक संतुलनच आपले जीवन सुसह्य करु शकते असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आशपाक आतार यांनी तर सूत्रसंचालन कु. तन्वी घोंगडे  हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.धनंजय लोंढे, प्रा. के. एस. कदम, प्रा. वसावे, एम.जी,प्रा. वागतकर एस.पी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे आभार  रिया तुळसे हिने मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top