उस्मानाबाद/प्रतिनिधी -

  उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नव्याने रूजु झालेल्या अधिष्ठाता डाॅ.शिल्पा डोमकुंडेवार मॅडम,यांचा पुष्पगुच्छ देऊन रुग्ण कल्याण समितीच्या वतीने स्वागत व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया,स्वच्छता सह इतर बाबी वरती चर्चा करण्यात आली,शुभेच्छा देतांना रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,मिशन वास्तल्य समिती सदस्य गणेश रानबा वाघमारे, निवृत्त इंचार्ज रौफ शेख ब्रदर,अंकित सवाई, पत्रकार श्रीकांत मटकिवाले,आरएमओ डाॅ.तानाजी लाकाळ, प्रशासन अधिकारी उदयकुमार कुलकर्णी,मॅटर्न जाधव मॅडम,श्रीमती सुनिता कदम,सिस्टर आणि इतर उपस्थित होते रौफ शेख यांनी प्रास्ताविक केले तर आभार गणेश वाघमारे यांनी मानले.

 
Top