उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 गुरु गोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे दि. २९ ते ३० डिसेंबर २०२२ दरम्यान विभागीय शालेय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .   या स्पर्धेमध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या 19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला .   हा विजयी संघ मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करेल.    या विजयी संघास  विक्रम सांडसे, इंद्रजित वाले यांचे मार्गदर्शन लाभले .

 विजयी संघाचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील , संस्था सरचिटणीस सौ . प्रेमाताई पाटील आणि प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील यांनी केले.  तर प्रशालेचे प्राचार्य देशमुख एस. एस ,  उपप्राचार्य घार्गे एस. के ,उप मुख्याध्यापक  कोळी एस. बी . , पर्यवेक्षक इंगळे वाय के , आर.बी. जाधव,श्रीमती गुंड बी.बी यांनी पुढील वाटचालीसाठी संघास शुभेच्छा दिल्या .


 
Top