उस्मानाबाद / प्रतिनिधी-

फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी पुणे द्वारा आयोजित सहकार गौरव सोहळ्यात, सन 2022 या वर्षाकरिता सहकार गौरव पुरस्कारसाठी "सर्वोत्कृष्ट संस्था" म्हणून 'रूपामाता मल्टीस्टेट'ची निवड करण्यात आली. 200 कोटी ठेव गटात, 'रूपामाता मल्टीस्टेट'ला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.

 हा पुरस्कार श्री.काकासाहेब कोयटे,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था, यांच्या हस्ते, श्री. उदयजी जोशी साहेब, राष्ट्रीय महामंत्री सहकार भारती, श्री.सुकेशजी झंवर साहेब,मुख्य कार्यकारी संचालक बुलढाणा अर्बन,  श्री.सुरेश वाबळे साहेब, संस्थापक अध्यक्ष फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट, प्रा.अंकलकोटे साहेब उपाध्यक्ष फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट यांच्या उपस्थितीत 'रूपामाता मल्टीस्टेट'चे संचालक ॲड.अजित व्यंकटराव गुंड पाटील, मुख्य कार्यकारी अध्यक्ष श्री.मिलिंद खांडेकर,ॲड.ऐश्वर्या अजित गुंड, श्री.सतीश कास्ते, लेखाविभाग प्रमुख यांनी स्वीकारला.

 

 
Top