परंडा / प्रतिनिधी - 

तालुक्यातील खासापुरी गाव मोकळे करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात आली. खासापुरी गावात ग्रामस्थांनी घरातील सामान शेतात व अन्य ठिकाणी हलवले असून राहती जागा सोडून जाण्याची वेळ ग्रामस्थांवर ओढावली आहे. या लोकांचे पुनर्वसन कसे करणार याबद्दल प्रशासन बोलायला तयार नाही.  या संदर्भात भाजपा आमदार राणाजगजिसिंह पाटीलयांना विचारले असता. ग्रामस्थांनी आपल्याशी संपर्क साधल्यास आपण मार्ग काढू, असे सांगितले. 

 खासापुरी गाव दि.४ जानेवारीपर्यंत मोकळे करून जमीनीचा ताबा देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.सध्या त्याच आदेशाची अंमलबजावण करण्यात येत आहे.गावाची लोकसंख्या अंदाजे २५०० असून सुमारे ३५० कुटूंबे राहात आहेत. यापैकी दलित कुटूंबाची संख्या १०९ आहे या कुटूंबांचे पुनर्वसन प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्ष घर बांधून होईपर्यंत ही कुटूंबे कुठे राहायला जाणार, याबाबत संभ्रम कायम आहे. 

खासापुरी येथील ग्रामस्थचे  पुनर्वसन होणार किंवा नाही याबाबत बोलायला संबंधीत अधिकारी तयार नाहीत.त्यामुळे खासापुरी येथील ग्रामस्थ हवालदिल झाले असून राहते घर सोडून जाण्याची वेळ आल्याने प्रशासनाविषयी त्यांच्यामध्ये रोष दिसून येत आहे. लोकांनी आपले सर्व सामान हलवले असून बरीच कुटूंबे शेतात उद्यड्यावर राहायला गेली आहेत.  या संदर्भात शनिवार दि. १४ जानेवारी रोजी अामदार राणाजगजितसिंह पाटीलयांना पत्रकारांनी खासापुरी ग्रामस्थांची माहिती दिल्यानंतर आपल्याशी संपर्क साधल्यास आपण मार्ग काढू, असे अामदार पाटील यांनी सांगितले. 


 
Top