मुरुम/प्रतिनिधी

उमरगा शहरातील डॉ. के. डी. शेंडगे इंग्लिश मेडिअम स्कुलमध्ये डॉ. सतिश दुधभातेंचा सत्कार सोमवारी (ता. ९) रोजी करण्यात आला. नर्सरी ते दहावी पर्यंतचे शिक्षण याच इंग्लिश स्कूलमध्ये झाले असून बारावीचे शिक्षण लातूर येथील शाहू महाविद्यालयात झाले

. नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण झाले. तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून (बालरोग तज्ञ) एमडीचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. सध्या पुणे येथील ससून रोड, रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजीसाठी त्यांची निवड झाली आहे. उमरगा शहर व परिसरातील शेंडगे स्कुलचा हा पहिला विद्यार्थी आहे. जो  सुपरस्पेशालिटीसाठी वैद्यकीय शिक्षणाची संधी प्राप्त केला आहे. डॉ. सतिश दुधभाते हे श्रीकृष्ण महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. अशोक दुधभाते व उमरगा येथील गटशिक्षण  कार्यालयातील साधन व्यक्ती सौ. अयोध्या चिगूरे-दुधभाते यांचे सुपुत्र आहेत. या प्रवेशाबद्दल डॉ. के. डी. शेंडगे ट्रस्ट व इंग्लिश स्कूलच्या वतीने अध्यक्ष डॉ. सचिन शेंडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

यावेळी ट्रस्टचे संचालक माजी प्राचार्य जी. के. घोडके, प्रा. अशोक दुधभाते, डॉ. विजय बेडदूर्गे, प्राचार्य डी. बी. कुलकर्णी, पी. आर. भुतेकर, अभियंता गजानन घोडके, गुंडू दुधभाते, पुणे जिल्हा परिषदेचे उपअभियंता रणजित काळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. तसेच परिसरातील विविध सामाजिक संघटना व संस्थांच्या वतीनेही डॉ. दूधभाते यांचा सत्कार करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 
Top