उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय स्टेट बँकेच्या महाव्यवस्थापक श्रीमती मेरी सगाया धनपाल यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे उमेद एम एस आर एल एम यांच्या सहकार्याने विविध महिला बचत गटांना सुमारे चार कोटी इतक्या रकमेच्या कर्जास मंजूरी देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की भारतीय स्टेट बँकेच्या उस्मानाबाद क्षेत्रीय कार्यालयामार्फत महिला बचत गटांसाठी कर्ज मंजुरीचा मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परीषद उस्मानाबाद येथे दि.17 जाने 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे, भारतीय स्टेट बँकेच्या नांदेड प्रशासकीय कार्यालयाचे उप महाव्यवस्थापक श्री. अकुला श्रीनिवास , उस्मानाबाद क्षेत्राचे सहायक महाव्यवस्थापक श्री. विलास शिंदे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक श्री.सचिन ससाणे तसेच एम एस आर एल एम चे जिल्हा प्रकल्प प्रबंधक डॉ. बलवीर मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

या प्रसंगी सुमारे 200 महिला बचत गटांना कर्ज मंजुरीच्या पत्राचे वाटप करण्यात आले. एमएसआरएलएम उस्मानाबाद  च्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रांजल शिंदे यांनी या प्रसंगी भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखांचे महिला बचत गटांना योग्य प्रकारचे सहाय्य लाभत आहे तसेच महिलाही बचत गटाच्या माध्यमातून सर्वार्थाने प्रगती करत आहेत असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना भारतीय स्टेट बॅंकेच्या महाव्यवस्थापक श्रीमती मेरी सगाया धनपाल यांनी  समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महिलांनी सशक्त होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. महिलांनी निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे गरजेचे आहे, तसेच समाजाचा विकास होण्यासाठी बचत, संरक्षण, व पतपुरवठा ही त्रिसूत्री अत्यंत महत्वाची आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. यासाठी प्रत्येक नागरिकाचे बचत खाते असणे आवश्यक आहे यासाठी ज्यांचे बचत खाते नसेल त्यांनी तात्काळ जन धन खाते उघडून बचतीस सुरुवात केली पाहिजे. यानंतर सर्वांनी आपल्यावर असलेली जबाबदारी ओळखून स्वतःला विमा संरक्षित करणे गरजेचे आहे यासाठी आपण शासनाच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनामार्फत अतिशय कमी रकमेत मिळणार्यान विमा कवचाचा लाभ घ्यावा, तसेच आर्थिक उन्नती साधण्यासाठी बँकेमार्फत राबविण्यात येणार्याउ मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजना, बचत गटांसाठी राबविण्यात येणार्या  कर्जयोजनांचा लाभ घेऊन स्वत:ची  पर्यायाने समाजाची आर्थिक उन्नती साधून घ्यावी असे आवाहन सर्व उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मुख्य प्रबंधक श्री. शरद खोले यांनी केले.


 
Top