तेर( प्रतिनिधी) उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे वैराग्य महामेरू संत गोरोबा काकांच्या  मंदिरामध्ये   षट्तीला  एकादशीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. 

मकर संक्रांति नंतर येणारी ही पहिलीच एकादशी असल्याने याच एकादशीला तिळगुळाची एकादशी असेही म्हटले जाते. त्यामुळे  भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी तेर व  परिसरासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. त्यामुळे मंदिर परिसरात तेरणा नदी काठापर्यंत पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. 
Top