उस्मानाबाद / प्रतिनिधी-

वसंतराव काळे असताना शिक्षक मतदार संघासाठी मी इच्छुक उमेदवार होतो, परंतू त्यावेळेस मला तु अजून तरूण आहेस, तुला पुढे संधी मिळेल, असे सांगितले गेले. वसंतराव यांच्या अचानक निधनानंतर त्यांचे पुत्र अामदार विक्रम काळे यांना संधी मिळाली. परंतू त्यांनी शिक्षक मतदार संघातील म्हणावे असे कामे न केल्यामुळे या मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळेच आपण या निवडणुकीत उभारलो आहोत. गेल्या १४ वर्ष विक्रम काळे यांच्यासाठी कामे केले. त्यानंतर मला संधी देणे अपेक्षीत होते. परंतू तसे झाले नाही, आम्ही काय फक्त सतरंज्याच  उचलायच्या का ? असा प्रश्न औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत उभारलेले उमेदवार प्रदीप सोळुंके यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

बुधवार दि. २५ जानेवारी रोजी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेस प्रा. सुशिल शेळके उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना प्राचार्य सोळुंके यांनी मी प्राध्यापक, प्राचार्य म्हणुन काम केले. देशात अनेक ठिकाणी व्याख्याने केली. शिक्षकांसाठी काम केले. कोणत्याही प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढायची धमक आपल्यात आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लाभार्थी नाही, त्यामुळे पक्षाने हाकालपट्टी केली असली तरी आपल्याला काय अिधकृत पत्र आले नाही, असे ही प्राचार्य सोळुंके यांनी सांगितले. 

संमृध्दीसाठी पैसा आहे, पण शिक्षणासाठी का नाही

सरकारकडे मंुबई-नागपुर या संमृध्दी महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसा आहे. तर शिक्षणासाठी पैसा नाही, विनावेतन, विना अनुदानीत यामुळे भावी पिढी कशी घडणार असे सांगून प्राचार्य सोळुंके यांनी शिक्षणावर पैसा खर्च करने गरजेचे आहे. नाहीतर भावी पिढी अपंग पिढी म्हणुन पुढे येईल िजथे शिक्षणावर खर्च होत नाही, तिथे पोलिसची संख्या वाढते, असे ही प्राचार्य सोळुंके यांनी सांगितले. 

 
Top