परंडा प्रतिनिधी - 

श्री गणेश जंयतीनिमित्त बुधवार  दि.२५ रोजी शहरात  विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील एकमेव ट्रस्टी असलेल्या जय भवानी गणेश मंदीरात गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी दर्शनासाठी शहरातील महिलां,भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.यावेळी "रक्तदान सर्वश्रेष्ठ दान" या सामाजिक  उपक्रमात  घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात एकुण ४१ गणेशभक्तांनी उत्फुर्तपणे रक्तदान केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंतीनिमित्त,शहरातील  जय भवानी चौकात भव्य मंडप उभारण्यात आला होता.मंदीरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.महिला मंडळानी  गणेश जन्माचा पाळणा बांधुन मोठ्या भक्तिभावात गणेशाचे स्वागत केले.गणेश मंदीरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.पोलीस निरिक्षक आमोद भुजबळ,वैद्यकिय अधिकारी डाॕ.देवदत्त कुलकर्णी  यांच्या हस्ते रक्तदान शिबीर शुभारंभ व महाआरती करण्यात आली.जय भवानी गणेश मंडळाच्यावतीने शहर परिसरातील आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या उत्सवासाठी व रक्तदानासाठी गणेश मंडळाचे आण्णा लोकरे, जयंत काशीद, सनी काशीद, कुणाल जाधव, राहुल काशीद,प्रकाश काशीद, गणेश काशीद,सुधीर मस्के, धीरज ठाकुर, गणेश आगरकर, पिटु पोरवाल, ओंकार काशीद,रोहीत बेदमुथा,आदित्य नांगरे,योगेश मस्के,आकाश काशीद,विनायक काटवटे,शंतनु कुलकर्णी,अतुल काशीद,बाॕबी काशीद,आण्णा काटवटे,वैभव मस्के,,उदय काशीद,अमित आगरकर,अनिकेत काशीद,साचिन भालेकर आदिसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.गणेश जयंतीनिमित्त हभप तेजस्वीनी नवले (राहुरी) यांचा किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.


 
Top