बालविवाह प्रतिबंध हा उपक्रम एक सामाजिक चळवळ होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी,  जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,  उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजभाऊ गलांडे आदी कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.
   प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभ संदेश देताना  पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत म्हणाले, आपल्या देशाचं लोकशाही संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आलं. म्हणून आपण  हा प्रजास्ताक दिन लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरा करतो. आजच्या दिनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना डॉ.सावंत यांनी अभिवादन केले.
    ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नंतर पालकमंत्री डॉ.सावंत यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक देऊन गौरव करण्यात आला. तसेच  क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीमती अश्विनी पाउडशेटे आणि  सारीका शिवाजी जटाळे यांचाही सत्कार करण्यात आला.  तर   ओमराजे सुभाष चव्हाण ,  साई सचिन शिंदे ,  सानवी कैलास गिलबिले ,  स्नेहा श्याम कवडे   यांचाही सन्मापत्र देऊन गौरव करण्यात आला.
 
Top