तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर येथे शाकंभरी नवरात्र उत्सवातील जलयात्रेत सौ.अर्चनाताई पाटील यांनी सहभागी होऊन आई तुळजाभवानी मातेचे आशीर्वाद घेतले. शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये अनेक भाविकांना दर्शनाची संधी मिळत नाही. या अनुषंगाने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. हत्ती, घोडे, कलश व विविध वाद्यांसह हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील सर्व मंडळे एकत्र येऊन सुयोग्य नियोजन करतात. शेतकरी बांधवांच्या आयुष्यातील दुःख दूर होऊन त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येवो हीच प्रार्थना..

याप्रसंगी   पिटू या गंगणे, .सचिन रोचकरी,  विशाल रोचकरी, आनंद कंदले,  अविनाश गंगणे, शांताराम पेंदे, औदुंबर कदम,  गिरीश कुलकर्णी, भरत सोनवणे, सर्व नगरसेवक, विविध मंडळे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top