तेर/  प्रतिनिधी 

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे बारावीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील बारावीच्या विद्यार्थी,विद्यार्थीनीसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन नरहरी बडवे यांनी आयोजन केले होते.या स्पर्धेतील विजेत्या प्रथम शितल गोडसे, व्दितीय निकीता माने, तृतीय प्रांजली ढोबळे यांना जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आली.यावेळी कला शिक्षक नवनाथ पांचाळ, क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे, उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन गोरोबा पाडूळे,लता बंडगर उपस्थित होते.

 
Top