परंडा /प्रतिनिधी - 

 परंडा तालुक्यातील स्थानांतरित खासापुरी गावा मध्ये स्थानांतर प्रक्रिया शासन स्तरावरून सुरू आहे सध्या स्थानांतर झालेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षणाचा मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधल्या नंतर सध्याचे स्थानांतरित ठिकाण शाळेपासून दूर असल्यामुळे मागील पंधरा-वीस दिवसांपासून आम्हाला शाळेला जाता येत नाही शाळेतील अभ्यासक्रम काय चालू आहे हे सुद्धा सध्या माहित नाही लवकरच परीक्षा सुरू होतील चालत जायचं म्हटलं तरी शाळा फार दूर आहे ही स्थानांतरित खासापुरी मधील विद्यार्थ्यांची परिस्थिती आहे याचा विचार करून स्थानांतरित ठिकाणीच वस्ती शाळेच्या स्वरूपात त्वरित प्राथमिक शाळा सुरू करण्यात यावी जेणेकरून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत त्यामुळे प्रथम प्राधान्याने प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था स्थानांतरित खासापुरी गावामध्येच निर्माण करावी अशी मागणी सुजित वाबळे नायब तहसीलदार तहसील कार्यालय परंडा यांना निवेदन देऊन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात आली.

     दिलेल्या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के ,जिल्हा सहसचिव मोहनबनसोडे ,फुले आंबेडकर विद्वत सभा डॉ.आनंद देडगे ,परंडा शहराध्यक्ष किरण बनसोडे,तालुका महासचिव राहुल पवार तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत


 
Top