परंडा /प्रतिनिधी - 

 येथील शंकरराव पाटील महाविद्यालयामध्ये परंडा येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांना I2OR रजिस्टरड एम एस एम इ मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2022 प्राप्त झाला आहे.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे शंकरराव पाटील महाविद्यालय भूम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाविद्यालयाचे संस्थापक प्रा डॉ तानाजी बोराडे, डॉ के जी गव्हाणे ,प्रा टाळके के यु, यांच्या हस्ते फेटा शाल पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा जी यु तिजारे, प्रा डॉ नितीन पडवळ, प्रा ए डी दुनघव, प्रा एस डी भोसले, प्रा जी एस खंदारे, प्रा जी डी गरड, श्री प्रकाश शेंडगे व डॉ समाधान शिंदे तसेच शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ गजेंद्र रदील वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संभाजी गाते इत्यादी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top