उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यातून रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बावी आश्रम शाळेचे 12 विद्यार्थी पात्र ठरले.शालेय विभाग स्तर रग्बी स्पर्धा क्रिस्ट इंटरनॅशनल स्कूल अहमदपूर जिल्हा लातूर येथे घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेमध्ये जवाहर माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय विद्यानगर बावी ता.जि.उस्मानाबाद येथील संघ 19 वर्षे वयोगटातील मुलांनी अंतिम सामन्यात लातूर ग्रामीण संघाला पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली . यामध्ये एकूण 12 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले, शाळा व संस्थेचे नाव उंचावल्याबद्दल संस्थेचे सचिव दयानंद मनोहर राठोड प्राचार्य जगताप बळीराम यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले, तसेच पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देण्यात आले . या यशासाठी क्रिडा मार्गदर्शक जगताप औदुंबर, अमोल शिंपी व विनोद राठोड व प्रशिक्षक अनिल राठोड यांनी विशेष मेहनत घेतली .


 
Top