उस्मानाबाद / प्रतिनिधी

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा केंद्र आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने ग्लोबल टॅलेंट ट्रॅक या कंपनीमार्फत रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पंधरा दिवसाचे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली जाणार आहे. या शिबिराचा उद्बोधन कार्यक्रम आज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात ग्लोबल टॅलेंट ट्रॅक कंपनीच्या समन्वयक कुमारी प्रियंका माळी बोलत होत्या.

  प्रियंका माळी म्हणाल्या की , जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच वेगवेगळ्या स्वरूपाची कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. कौशल्य आत्मसात केल्यास या जागतिक करण्याच्या स्पर्धेत टिकून राहता येईल असे प्रतिपादन प्रियंका माळी यांनी  केले.

  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना म्हणाले की, महाविद्यालयातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन शिबिरामध्ये सहभागी व्हावे,विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी महाविद्यालयाकडून पुरवल्या जातील अशा प्रकारचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी केले .

 या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. शांतिनाथ घोडके उपस्थित होते. डॉ.घोडके विद्यार्थ्यांना संवाद साधताना म्हणाले की, अशा प्रकारच्या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे.

   कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. मारुती अभिमान लोंढे यांनी केले, सूत्रसंचलन डॉ.नितीन गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. माधव उगिले यांनी केले.     सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.     सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top