तेर/ प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील विविध स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

मराठी वृत्तपत्रांचे जनक  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तेर ता. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध , लंगडी धावणे , पोत्यातील उड्या आदि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी शुक्रवार दिनांक ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून विजेत्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील निबंध स्पर्धेत सिध्दी बालाजी आंधळे , प्राची बबन कोकरे , अमृता मोहन भोंडवे , जिदान महामुद शेख, धावण्याच्या स्पर्धेत मुलींमध्ये अक्षरा बालाजी माने , सिया नवनाथ थोरात , देवयानी गुरुनाथ कोकरे , मुलांमध्ये संग्राम नागनाथ टेळे , सार्थक दत्ता कोकरे , राजवीर विश्वास ढोबळे , पोत्यातील उड्याच्या स्पर्धेत मुलांमध्ये आदर्श विकास पांढरे , समर्थ दत्ता कोकरे , राज बालाजी सुरवसे , मुलींमध्ये पूनम काकासाहेब नारे , गायत्री रामराजे गाढवे , कल्याणी सोमनाथ सौदागर ,  तर लंगडी स्पर्धेत इयत्ता दुसरीच्या वर्गातील मुला मुलांनी विजय मिळवला .यामध्ये मुलीमध्ये जाधव अमृता , लकडे जान्हवी , देशमुख ईश्वरी , देवकते नंदीनी , कोळपे संस्कृती , झिंजे आदिती , भोंडवे ईश्वरी , कोकरे ज्ञानेश्वरी , ढोबळे स्वप्नाली , हजारे पूजा , मुलांमध्ये सिध्दांत सैलानी , कोकरे वीर माने हरिओम गायके कार्तिक ढोबळे अक्षद देवकते रविराज समर्थ आगलावे मळगे प्रतीक ढोबळे श्रेयस कदम गजानन आदि विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत संपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले .यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ , गोरोबा पाडुळे , पत्रकार सुभाष कुलकर्णी , बापू नाईकवाडी , सुमेध वाघमारे , नरहरी बडवे , हरी खोटे , सागर ढोणे , विकास भोरे , विजय कानाडे , गणेश साखरे , गोरख माळी , शेजाळ वर्षा , चौरे गोरख , नाईक उषा , मुंढे प्रभावती , हलसीकर  रोहिणी , बंडगर लता , पांचाळ शकुंतला , क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , चंदकांत गिरे आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top