तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयात कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक स्पर्धेस प्रारंभ झाला.

संस्था अंतर्गत प्राथमिक गटात वकृत्व, चित्रकला, कथाकथन, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी या स्पर्धेचे उद्घाटन तेरच्या सरपंच दिदि काळे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.बी.बेद्रे होते.तर उपसरपंच श्रीमंत फंड, साहेबराव मेटे, गोरख माळी, नरहरी बडवे, अजित कदम, संजय लोमटे,प्रतिक नाईकवाडी, अविनाश आगाशे, नवनाथ पसारे, रामा कोळी,बापू नाईकवाडी, किरण अबदारे , नंदकुमार खोत यांची प्रमुख उपस्थिती होती.सुत्रसंचलन वाघेरे यांनी केले तर आभार एस.यू गोडसे यांनी मानले. 

 
Top