उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र ऑलीम्पिक संघटना आणि महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या वतीने अमरावती येथे चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलीम्पिक धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत रिकर्व्ह राउंड प्रकारातून उस्मानाबाद जिल्ह्याच्या आर्यन, रय्यान, प्रणव व शौर्या धनुर्धरांच्या संघाने टीम एलिमिनेशन मध्ये रौप्य पदक पटकाविले आहे.

सातारा, अमरावती या जिल्ह्याच्या बलाढ्य संघाना नमवत उस्मानाबाद जिल्ह्याच्या संघास अतिशय अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात नाशिक संघासोबत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

विजेत्या उस्मानाबाद जिल्हा संघात आर्यन गरड, रय्यान सिद्दीकी, प्रणव कोळी व शौर्या जामगे या धनुर्धराचा समावेश होता, संघ मार्गदर्शक म्हणून आर्चरी असोसिएशन ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्टचे सचिव प्रवीण गडदे यांनी काम पहिले.

 
Top