तुळजापूर/ प्रतिनिधी-

 मकर संक्रांतीनिमित्त जास्तीत जास्त महिला भाविकांचे  दर्शन सुलभ व्हावे, त्यांना देविस वानवसा देण्यासाठी  श्री तुळजाभवानी मंदीर रविवार दि. १५रोजी पहाटे एक वाजता चरणतिर्थ होवुन दर्शनार्थ उघडले जाणार आहे.

तसेच स्थानिक महिलांना आधारकार्ड दाखवुन मंदीरात प्रवेश दिला जाणार आहे.  रविवार दि.१५ रोजी मकर संक्रांती या दिवशी चरणतिर्थ पहाटे ०१:०० वाजता होईल व सकाळची पुजेची घाट ०६:०० वाजता होऊन अभिषेक पुजा होईल. तसेच स्थानिक महिलांनी मंदिरामध्ये प्रवेश करणे करीता आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक आहे. आधारकार्ड दाखविले शिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे. संक्रांतीनिमित्त शनिवार-रविवार  महिला भाविकांची गर्दी राहणार आहे.


 
Top