उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 मकरसंक्रांती निमित्त लेडीज क्लब, उस्मानाबाद यांच्या वतीने दिनांक २७/०१/२०२३ रोजी सायंकाळी ०५.३० वाजता लेडीज क्लब, धाराशिव (उस्मानाबाद) येथे हळदी-कुंकू, तिळगुळ वाटप व 'कोण होणार उस्मानाबादची होममिनिस्टर..?' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 विजेत्यांना पैठणी व आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत. तरी सर्व माता-भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांनी केले आहे. 

 
Top