उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गवळी गल्लीतील धाराशिवचा महाराजा  मानाचा गणपती श्री बाल हनुमान गणेश मंडळ यांच्या वतीने गेल्या 58 वर्षापासून मंडळाच्या सामाजिक धार्मिक व महिलांच्यासाठी हळदीकुंकू व तिळगुळ वाटप  व भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रमाने  गणेश जयंती साजरी केली जाते. यावर्षी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य वाटप व रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे.

.दुपारी चार वाजता महिला मंडळाचे भजन   पाच वाजता इस्कॉन या संस्थेतर्फे हरेकृष्ण हरे राम यांचे भजन  साडेपाच वाजता गीता पठण व सहा वाजता अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम आयोजित केले गेले आहे .गणेश जन्मोत्सव ,गुलाल उत्सव ,गणेशाचा पाळणा व पूजाविधि, प्रसाद वाटप व केला जाणार.

उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध संस्थेच्या माध्यमातून व व्यक्तिगत यांनी आपले नाव कार्यातून उज्वल केले अशा विविध गुणवंत व आदर्श  व्यक्तींचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर गौरी बागल, डॉक्टर तृप्ती पवार ,डॉक्टर सतीश अधटराव  डॉक्टर सुधीर सोनटक्के अवघड मणक्याची यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल .

शिवजयंती महोत्सव व शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष धनंजय राऊत व धर्मराज सूर्यवंशी, रमेेश यादव, राम भुतेकर, राज्य पातळीवरील बालनाट्य महोत्सवांमध्ये उत्कृष्ट बालकलाकार म्हणून माननीय राज्यपालांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरीविलेले बालकलाकार विश्वतेज भाळे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट पदी सदस्य म्हणून राज्यपाल नियुक्ती झालेले देविदास पाठक , सायबर गुन्हेगारी विरुद्ध जनजागृतीसाठी 100 पथनाट्याचे प्रयोग करून पोलीस कार्यालयाने जनतेच्या हितासाठी व फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी प्रबोधनात्मक कार्य केलेल्या कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे.

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव साजरा होत असताना मंडळ यावर्षी गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेश भक्त आपली श्रद्धा, भक्ती व शक्ती या विविध कार्यक्रमातून श्री चरणी अर्पण करीत आहे या भक्तीच्या मागे भारत देशात समानता, राष्ट्रीय एकात्मता, महिलावर होणाऱ्या अत्याचार व अन्याय करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी, स्त्रीभ्रूणहत्या रोखावी , यावर्षीचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरी केले जात आहे . सर्व माणसांनी पौष्टिक तृणधान्याचा  वापर जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये करावा. सुख ,समृद्धता व देशाची मान उंचावयास हवी यासाठी यावर्षीची पूजा व गणेश जयंती साजरी केली जात आहे. मंडळाचे पदाधिकारी मनमथ पाळणे, प्राध्यापक गजानन गवळी, विष्णुदास सारडा, काशिनाथ दिवटे, डॉक्टर अजित नायगावकर, इत्यादींनी आवाहन केले आहे .


 
Top