उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने महायुतीचे उमेदवार प्रा.किरण पाटील यांच्या प्रचारार्थ दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस   संत एकनाथ रंगमंदिर संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहणार असून याद्वारे मराठवाड्यातील ६५ हजार शिक्षकांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण भारतीय जनता पार्टीचे मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक प्रभारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी लातूर शिक्षण मंडळाचे माजी संचालक व शिक्षकांच्या प्रश्नांवर अनेक वर्ष काम केलेले माध्यमिक शिक्षक संघटनेचे प्रदीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले   सुधाकर आबदारे सर यांना दिले.

 महायुतीचे उमेदवार प्रा. किरण पाटील यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या माध्यमातूनच जुन्या पेन्शन योजनेचा विषय मार्गी लागण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला असून आज मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी देखील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत महायुती सरकार सकारात्मक असल्याचे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जुनी पेन्शन योजनेचा (OPS) अभ्यास करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 शिक्षकांच्या सार्थ मागण्यांवर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याची क्षमता याच सरकार मध्ये असून केंद्र शासनाच्या सहकार्याने अनेक वर्षापासूनचा हा विषय मार्गी लागण्याच्या शिक्षकांच्या आशा उंचावल्या आहेत. विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठी नुकतेच महायुती सरकारने १ हजार १६० कोटी मंजूर केले आहेत.

 उपमुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस साहेब संभाजीनगर (औरंगाबाद) येथे दिनांक २५ जानेवारी रोजी शिक्षकांच्या मेळाव्यास संबोधित करणार असून या मेळाव्याचे ऑनलाईन निमंत्रण आज आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक  सुधाकर आबदारे सर यांची भेट घेऊन त्यांना दिले. मराठवाड्यातील जवळपास ६५ हजार शिक्षक मतदारांना या मेळाव्याचे ई - निमंत्रण देण्यात येणार असून या सर्वांना ना. देवेंद्रजी फडणवीस ऑनलाइन संबोधित करणार आहेत.

 यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.राजसिंह राजेनिंबाळकर आदी उपस्थित होते.


 
Top