परंडा /प्रतिनिधी - 

  शहरातील कुर्डवाडी रोडजवळील असलेल्या शेतातील दीड एक्कर नवीन लागवड केलेला दीड महिन्याचा दीड एकर ऊस मोकाट जनावरांनी ( दि.१५ ) रात्री खावून फस्त केला.यामुळे हजारो रुपये खर्च करून ऊस लागवड केलेल्या शेतकर्‍याचे नुकसान झाले आहे . मोकाट जनावरांचा त्रास सुरुच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे तर नगर पालिका प्रशासन मोकाट जनावरांच्या अज्ञात मालकांपुढे हतबल झाली आहे ! मोकाट जनावरे पकडून गोशालेत पाठवावीत . नगर पाली केचा कोंडावडा कुचकामी असून गोशाला हाच ठोस पर्याय आहे . त्यामुळे या जनावरांची धरपकड करून गोशालेत पाठवावेत . अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .

मोकाट जनावरानी दीड महिन्यापुर्वी लावलेला दीड एकर उस पुर्ण खाल्लला. यापुर्वी भुईमूग, हरभरा व गहू हि पिकं खाऊन नुकसान केलेले आहे .तक्रार करुन , निवेदन देऊनही या मोकाट जनावरांचा बंदोबस्त होत नाही . शेतात काही पेरावे कींवा नाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे,प्रशासन पुर्ण दुर्लक्ष करत आहे

-विकास कुलकर्णी , शेतकरी परंडा.


 
Top