उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शहरातील आदर्श परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे आयोजित मकर संक्राती निमित्त श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या प्रांगणात महिलांच्या भरगोस प्रतिसादाने उत्साहाने संपन्न झाला. प्रथम उस्मानाबाद जि. प . अध्यक्षा सौ. अर्चना पाटील , जिल्हाधिकरी यांच्या सुविधपत्नी सौ. ओंबासे , अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांच्या सुविधपत्नी सौ. कावत , जिल्हान्यायाधीश यांच्या सुविध पत्नी सौ. मधुरा कर्वे ,आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा आयोजक सौ. प्रेमा सुधीर पाटील,सौ. मंजुळा आदित्य पाटील सौ.डॉ. अश्विनी निखिल कांदे- पाटिल यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलनासह श्री. तुळजाभवानी प्रतिमा पुजन आरतीने हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. या हळदी कुंकू कार्यक्रमात मकर संक्रांतीचे महत्व कार्यक्रमाच्या निवेदिका सहशिक्षिका सौ.अर्चना देशमुख यांनी सांगितले त्याच बरोबर निवेदक प्रा. गुरुनाथ जाधव यांनी महिलांच्या विविध स्पर्धा गीतांचे बोल ओळखणे, उखाणे , विविध वेशभुषा, तळ्यात मळ्यात , अभिनय करणे अथ्या विविध स्पर्धांचे सादरीकरण करुन घेतले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणाक्रमे नॉनस्टीक कुकर, नॉनस्टिक पॅन , हॉट पॉट , टिफीन बॉक्स चे वितरण करण्यात आले. आदर्श परिवारातर्फे हळदी कुंकू कार्यक्रमासाठी तहसीलदारा , पोलिस अधिक्षिका विविध पक्षाच्या महिला पदाधिकारी , समाजातील प्रतिष्ठित माहिलांची उपस्थित होत्या  सुमारे दोन हजारांहून अधिक महिलांना लुट वान , आदर्श २०१३ दिनदर्शिका देण्यात आले सर्वांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती सदर कार्यक्रमात संगीत विशारद सहशिक्षक महेश पाटील यांच्या गायनाचे रसिकांनी  श्रवण केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षिका सौ.बी .बी . गुंड व सर्व शिक्षिका कलाध्यापक शिवाजी भोसले , शेषनाथ वाघ , स्वप्निल पाटील सर्व सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले आभार सौ. मंजुळा आदित्य पाटील यांनी मानले .


 
Top