तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सव निमित्ताने  पौष शु. १२ शके १९४४ मंगळवार दि. ०३ / ०१ / २०२३ रोजी सकाळी  .पापनास तीर्थ ते मंदीर  महाद्वार जलयाञा सोहळ्यास आरंभ होणार आहे.

हा जलयाञा सोहळा पापनाश तिर्थकुंड येथुन सकाळी सात वाजता आरंभ होणार आहे. तो छञपती शिवाजी महाराज चौक, भवानी रोड मंदीर महाध्दार मधुन श्रीतुळजाभवानी मंदीरात प्रवेश करणार आहे. जलयाञा सोहळ्यानंतर  भवानी रोड येथे दुपारी १२. ००वा. पासुन अन्नदान महाप्रसाद वाटप होणार आहे., तरी सर्व  भाविक भक्तांनी हा दिव्य सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन  श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट श्री क्षेत्र तुळजापूर यांनी केले आहे.


 
Top