तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील जळकोट थेथील जि प प्रशालेतील  परिचर या पदावरून आपली 36 वर्षाची बिनतक्रार सेवा बजावणारे  परिचर रमेश हरिहरराव पाटील हे नियत वयोमानानुसार 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त झाल्याप्रित्यर्थ प्रशालेच्यावतीने मान्यवरांच्या उपस्थितीत शाल, फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ, श्रीफळ व भिंतीवर लावायचे घड्याळ भेट देऊन सपत्नीक  यथोचित  सत्कार करून निरोप देण्यात आला.                 

 यावेळी  सेनेचे कृष्णाथ मोरे,  विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे बसवराज कवठे, पत्रकार संजय रेणुके यांनी यावेळी आपल्या भावना मनोगतामधून व्यक्त केल्या.  सेवानिवृत्ती  कार्यक्रमासोबत  प्रशालेतीलच प्रभारी मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले हनुमंत जाधवर व सहशिक्षक दत्तात्रय सोमवंशी यांची पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी नियुक्ती होऊन उस्मानाबाद तालुक्यातील पाटोदा येथे हनुमंत जाधवर  तर भुसणी  तालुका उमरगा येथील प्रशालेमध्ये दत्तात्रय सोमवंशी  सेवेत दाखल झाले आहेत. त्यामुळे  त्यांचाही सत्कार  जळकोट प्रशालेतर्फे करण्यात आला

 यावेळी  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माळगे, काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हा युवा उपाध्यक्ष श्रीनिवास अशोकराव पाटील, विश्वास भोगे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष खंडू चंदे, प्रभारी मुख्याध्यापक सारणे,  सहशिक्षक प्रदीप तरमोडे, वैभव पटवारी, शिंदे, सौ. पुष्पलता कांबळे, माजी सैनिक संजय स्वामी, हरीश पाटील, योगेश पाटील, इयत्ता पाचवी ते दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.  

 
Top