उस्मानाबाद / प्रतिनिधी -

धाराशिव  शहरातील धडाडीचे नगरसेवक प्रदीप भैय्या मुंडे यांच्या वाढ दिवसानिमित्त शहरात आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहरातील माऊली चौकात आज ३१ डिसेंबर २०२२ रोजी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रदीप भैय्या मुंडे मित्र मंडळ, त्रिमूर्ती मित्र परिवार, माऊली मित्र परिवार आणि रामराज्य प्रतिष्ठान धाराशिव यांच्या संयुक्त पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. 

जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी विभागाचे कर्मचारी आणि प्रदीप भैय्या मुंडे मित्र परिवारातील तरुणांनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

सकाळी १०:३० वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात झाली सायंकाळी ५ वाजेपर्यंत १०१ दात्यानी रक्तदान करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवला. विशेषतः काही महिलांनीही रक्तदान करून शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

 
Top