उस्मानाबाद / प्रतिनिधी

 श्री लक्ष्मण विठ्ठल आखाडे होमगार्ड जिल्हा रायगड हे दि. 05 सप्टेंबर 2022 रोजी गणेशोत्सव बंदोबस्तकरिता खालापूर पोलीस स्टेशन येथे लक्ष्मण विठठल आखाडे होमगार्ड रात्रपाळीसाठी दरोडा प्रतिबंधक पथक या ठिकाणी कर्तव्यावर असताना पहाटे 01.30 वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे येथे अपघात झाला होता. या अपघातामध्ये श्री. आखाडे यांना कायम स्वरुपी अपंगत्व आले होते.

 महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील होमगार्डना विमाचे संरक्षण प्राप्त व्हावे, या करिता 40 हजार होमगार्डचे एचडीएफसी बँकेत खाते उघडून सर्वांना विमा संरक्षण मिळवून दिले आहे.

 दि. 16 जानेवारी 2023 रोजी होमगार्डच्या इतिहासात प्रथमच 25 लाखाचा धनादेश होमगार्ड लक्ष्मण विठठल आखाडे जिल्हा रायगड यांना विम्याची रक्कम म्हणून डॉ. बी. के. उपाध्याय, भा.पो. से. महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई व श्री ब्रिजेंशसिंह, भा.पो.से. उपसमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपस्थित सुपुर्द करण्यात आला. या वेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हा समादेशक अतुल झेंडे अपर पोलिस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक आणि एच डी एफ सी बँकेचे कर्मचारी श्री.कोचर व श्रीमती सावंत आणि इतर यांच्या समक्ष धनादेश देण्यात आला.


 
Top