उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 सोलापूर-उमरगा हा महामार्ग हा वास्तविक 2016 मध्ये पुर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापपर्यंत या महामार्गाचे काम अपुर्ण असून हा महामार्ग अपुर्ण असल्याने या रस्त्यावर शेकडो नागरिकांचे अपघाताने मृत्यु झालेले आहेत. सदर महामार्गाचे अपुर्ण काम पुर्ण करण्याकरीता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी 31 डिसेंबर 2022 पर्यंतचा अल्टिमेटम देवूनही सदर महामार्गाचे काम सुरु न झाल्याने दि. 1 जानेवारी 2023 पासून महामार्गावरील टोल वसूली बंद केली होती त्याचा परिणाम म्हणुन 18 जानेवारी 2023 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सोलापूर चे प्रकल्प संचालक श्री. चिटनीस तसेच टोल कंपनीचे प्रतिनिधी व इतर अधिकाऱ्यांसमवेत सदर महामार्गाची पाहणी केल्यानंतर बऱ्याच ठिकाणी अपुऱ्या यंत्रणेद्वारे कामे सुरु असल्याचे निदर्शनास आले त्यानंतर आज उमरगा येथे सदर अधिकाऱ्यांसमवेत पत्रकार परिषदेचे आयोजन करुन महामार्गाच्या कामात सुधारणा करणेकरीता प्रत्येक महिण्याला चालू कामाचा आढावा घेणार असून चालू कामांवर यंत्रणा वाढविणेबाबत सुचना करण्यात आली तसेच 12 जुलै 2023 पर्यंत सदरील महामार्गावरील एकेरी वाहतुक व पुल पुर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी सहमती दर्शविली आहे. तसेच मे 2023 मध्ये कोणत्याही परिस्थितीत 50 टक्के काम पुर्ण करणेबाबत एकमत झाले असून सदरील कामाचा दोष निवारण कालावधी 2039 पर्यंत असल्याने हा रस्ता सुस्थितीत ठेवणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असल्याचे निदर्शनास आणुन दिले.

 जेकेकुर ते उमरगा शहरापर्यंत माकणी धरणावरील पाणीपुरवठा पाईपलाईन स्थलांतरित करणेबाबत ही सुचना केली. त्यानंतर उमरगा शहरातून जाणारा पुर्वीचा महामार्ग नगरपालिकेने पालकीच्या ताब्यात घेवून रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम करुन मंजूर असलेला निधी खर्च करणेबाबत सुचना करण्यात आल्या तसेच सदरील रस्त्याचा बृहद आराखडा तयार होत असताना ज्या त्रुटी राहिल्या त्या प्रामुख्याने उड्डाणपुल, अंडग्राऊंड पुल, सर्विस रोड आदी कामांचा सुधारित डीपीआर तयार करणेबाबत सुचना करण्यात आल्या सदर रस्त्यावरील अनेक ठिकाणी कामे चालू असून कामाच्या ठिकाणी दिशा दर्शक बोर्ड व अपघात टाळण्यासाठी उपाययोजना 15 दिवसाच्या आत करणेबाबत सबंधितांना देण्यात आल्या.

   सद्या या रस्त्याचे उर्वरित काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे वर्ग झाल्याने उर्वरित अपुर्ण काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या नियंत्रणाखाली चालू आहे. टोलवसुलीतून जमा होणारा पैसा ह्याच रस्त्याच्या कामाकरीता खर्च होणार आहे. त्यामुळे हे टोलनाके बेमुदत बंद राहिल्यास ह्या रस्त्यासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडू शकतो त्याकरीता आपण टोलबंद आंदोलन हे तात्पुरत्या कालावधीकरीता स्थगित करावे अशी विनंती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी विनंती केली त्यानंतर कामे चालू झाल्याने टोल सुरु करण्याचे मान्य केले तसेच भविष्यात सदरील कामाबाबत यंत्रसामग्री कमी असल्याचे निदर्शनास आल्यास, कामाची गती कमी झाल्यास, दिलेल्या सुचनांचे पालन न झाल्यास शिवसेनेच्या वतीने पुन्हा टोल बंद केला जाणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

  याप्रसंगी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, सोलापूरचे प्रकल्प संचालक श्री. चिटनिस, केशव ऊर्फ बाबा पाटील, सुरेल वाले, दिपक जवळगे, बाबुराव शहापुरे, सुधाकर पाटील, कमलाकर चव्हाण, संतोष कलशेट्टी व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच टी.एम.पी.एल. कंपनीचे मनोजकुमार, रमेश पाटील, बी.पी.बी.ए कंपनीचे धर्मेंद्र, उमरगा तालुक्यातील पत्रकार बांधव, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top